तभा वृत्तसेवा
यवतमाळ
Solar agriculture pumps सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकèयांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरण यवतमाळ आणि पुसद विभागात मंगळवार, 6 व बुधवार 7 जानेवारी रोजी उपविभागीय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारी असलेल्या सौरकृषीपंपधारक वीजग्राहकांनी याच लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
मंगळवार, 6 जानेवारी यवतमाळ विभागांतर्गत येणाèया बाभुळगाव उपविभागीय कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 1 व कळंब उपविभागीय कार्यालयात दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेदरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी पुसद विभागाअंतर्गत सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पुसद शहर व पुसद ग्रामीण उपविभागीय कार्यालयात व दुपारी 3 ते 6 दरम्यान महागाव उपविभागात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, 7 जानेवारीला Solar agriculture pumps सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान पुसद विभागांतर्गत उमरखेड व दुपारी 3 ते 6 वाजता ढाणकी उपविभागात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यवतमाळ विभागांतर्गत सकाळी 10 ते 1 दरम्यान यवतमाळ व दुपारी 3 ते 6 वाजता राळेगाव उपविभागीय कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या मार्गदर्शनात व कार्यकारी अभियंते पुरूषोत्तम चव्हाण, जनार्दन चव्हाण यांच्या पुढाकाराने पार पडत असलेल्या या मेळाव्यात शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारींचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने महावितरणने केले आहे.