वैशालीनगरमध्ये शिलाई व ब्यूटी वर्गाचा समारोप

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Vaishalinagar रा.स्व.संघ, लोककल्याण समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या “स्वयंसिद्धा” प्रकल्पांतर्गत वैशालीनगर सेवा वस्तीमध्ये सुरू झालेल्या शिलाई वर्गाचा समारोप आणि ज्यांनी कोर्स पूर्ण केला त्यांना सर्टिफिकेट वितरण, तसेच सौंदर्य प्रशिक्षण केंद्राचे (ब्यूटी पार्लर) उद्घाटन तसेच नव्या शिलाई वर्गाचे उद्घाटन असा कार्यक्रम उत्साहात झाला.
 
Vaishalinagar
 
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमाताचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिलाई वर्ग शिक्षिका विशाखा पांडे आणि सौंदर्य प्रशिक्षण शिक्षिका भावना ठाकूर यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. Vaishalinagar शिलाई वर्गाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनात होणाऱ्या उपयोगाबद्दल समजावून सांगण्यासाठी किरण दांडेकर, ज्या कठीण परिस्थितीतून आपले ब्यूटीक यशस्वीरित्या चालवत आहेत, यांनी मुलींना थोडक्यात आपला प्रवास सांगितला.
 
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी अजनी भाग सह सेवा प्रमुख पद्माकर साठे तसेच नरेंद्रनगर सह सेवा प्रमुख घूघल उपस्थित होते. Vaishalinagar कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महानगर संस्कार केंद्राचे टोळी सदस्य सुजाता सरागे, अजनी भाग संयोजिका रतिका काशीमकर, सह संयोजिका अपूर्वा ठेमदेव, विशाखा पांडे, भावना ठाकूर यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य: रतिका काशीमकर, संपर्क मित्र