तालुकास्तर शालेय क्रीडास्पर्धेत 3 हजार विद्यार्थ्यांनी गाजवले मैदान

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

यवतमाळ,
Yavatmal taluka school sports, खेळ, क्रीडा व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती यवतमाळच्या विद्यमाने तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तथा क्रीडा संकुल यवतमाळ येथे करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. अप्रतिम दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच सांघिक, वैयक्तिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
 

Yavatmal taluka school sports,  
या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी वंदना नाईक, गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, उपशिक्षणाधिकारी (योजना) दयाशंकर चितळकर, विस्तार अधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाने, सहायक विस्तार अधिकारी प्रकाश येरमे व विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक विस्तार अधिकारी विद्या वैद्य यांनी केले. या तीन दिवसीय सामन्यात तालुक्यातील 3 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात सर्वाधिक गुण घेऊन हिवरी केंद्र अव्वल ठरले. सर्वसाधारण विजेतेपद हिवरी केंद्राने तर उपविजेतेपदी अकोला बाजार केंद्राने पटाकवले. सांस्कृतिक कार्यक्रमात सामूहिक नृत्यात वडगाव (जंगल) तसेच एकल नृत्यांमध्ये वडगाव (रोड) या शाळांनी बाजी मारली. नाट्यस्पर्धेत लोहारा या शाळेने बाजी मारली.
वैयक्तिक खेळात विविध Yavatmal taluka school sports, शाळांतील स्पर्धकांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या क्रीडा स्पर्धांसाठी विविध समित्यांतर्गत सहायक विस्तार अधिकारी प्रकाश येरमे, मिलिंद देशपांडे, पुंडलिक बुटले, सुनीता बुटले, राजहंस मेंढे, विलास किनवटकर, देव देबरे, राजकुमार भोयर, देवेंद्र लोटे, श्याम पहुरकर, देवानंद सोयाम, नदीम पटेल, रुपेश हिवरकर, बाळू खंडरे, सविता उईके यांनी कार्य केले. या क्रीडा स्पर्धेचे धावते समालोचन राजहंस मेंढे यांनी केले. संचालन अश्विनी वानखडे यांनी, तर आभार विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाने यांनी मानले.