तभा वृत्तसेवा
वणी,
bachchu-kadu : शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा तसेच शेतकèयांचे प्राण घेणाèया वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी माजी मंत्री बच्चू कडू हे येत्या शिवजयंतीपासून राज्यभर पदयात्रा काढणार आहेत. या आंदोलनाची मशाल पेटवण्यासाठी वणीत शेतकèयांचा ‘महाएल्गार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना बच्चू कडू यांनी शेतकèयांना थेट आवाहन करीत, तुम्ही पाठीशी असाल तर मी तुमच्यासाठी मरेपर्यंत लढेन. 30 जूनपर्यंत शेतकèयांची कर्जमाफी जाहीर झाली नाही, तर 1 जुलै रोजी राज्यात एकही रेल्वेचे चाक फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शेतकरी संघटना, किसान सभा व प्रहार संघटनेच्या वतीने या महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीन या मेळाव्याला उपस्थित होते. प्रारंभी अॅड. दीपक जोगी, अनिल हेपट व माजी आमदार वामनराव चटप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
माजी आमदार वामनराव चटप यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती व्यवसाय तोट्यात गेल्याचे सांगितले. शेतकरी कर्जबाजारी होत असताना सरकारवरही तब्बल 9 लाख 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कापसाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकèयांना प्रतिक्विंटल सुमारे अडीच हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मेळाव्यासाठी सतीश देरकर, अनिल घाटे, देवराव धांडे, दशरथ पाटील, मुबीन शेख, रघुवीर कारेकर, सय्यद अहमद व अनिल गोवारदीपे यांनी पुढाकार घेतला.