नागपूर,
dr anand yadav प्रसिद्ध सिकाई मार्शल आर्ट्स खेळाडू डॉ. आनंद बाबूलाल यादव यांनी नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून सुवर्णपदक पटकावल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. आनंद यादव यांचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा व सन्मानचिन्ह प्रदान केले.
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी कठोर मेहनत, शिस्त आणि निष्ठेच्या जोरावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड घडवून देशाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. ही कामगिरी केवळ एक विक्रम नसून तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. आनंद यादव यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत प्रशंसेचे प्रतीक म्हणून भेटवस्तूही प्रदान करण्यात आली.
डॉ. आनंद बाबूलाल यादव यांच्यासोबत आर्यन नारायण बोरकर या समर्पित सिकाई मार्शल आर्ट्स खेळाडूनेही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दोघांनी चेन्नई येथे आयोजित अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रयत्नात सहभाग घेतला होता. या ऐतिहासिक कार्यक्रमात देशभरातून हजारो मार्शल आर्ट्स खेळाडूंनी सहभाग नोंदवला.dr anand yadav आपल्या यशाचे श्रेय डॉ. आनंद यादव यांनी सोनाई रामभरोसे यादव, मास्टर रविंद्र गायकवाड, अमित गुप्ता, राणी बाबूलाल यादव, अरविंद यादव यांना दिले आहे. त्यांच्या या यशामुळे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला असून, क्रीडा क्षेत्रात नवे प्रेरणास्थान निर्माण झाले आहे.