वनविभागाच्या लाभ घेण्याचे आवाहन

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
नागपूर,
forest-department : शासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणार्‍या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हा प्रमुख हेतू आहे. वन विभागामार्फत विविध सेवा पुरविण्यात येतात. यात प्रामुख्याने  तेंदुपान कंत्राटदार,उत्पादक यांची नोंदणी करणे, बांबू पुरविणेसाठी नवीन कामगाराची नोंदणी करणे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई मंजुर करणे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे, वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुर करणे इत्यादी सेवांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना वनविभागाच्या वतीने आवाहन केले आहे.
 
 

ngp