मुख्याध्यापिकासह परिचर एसीबीच्या जाळ्यात

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
गोंदिया, 
bribery-case : सालेकसा तालुक्यातील सातगाव (साखरीटोला) येथील श्री विद्या गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह परिचराला ५ जानेवारी रोजी ३ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अजया जागेश्वर चुटे असे मुख्याध्यापिकेचे व देवराज अनंतराम चिंधालोरे असे परिचराचे नाव आहे.
 
 
 
gon
 
 
 
तक्रारदार हे श्री विद्या गल्स हायस्कुलमध्ये १ जून १९९७ पासून परिचर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार मे २०२५ पासून त्यांचे वेतन निघत होते. त्यामुळे त्यांनी १ जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या १६ महिन्याची लाभाच्या फरकाचे बील थकीत होते. हे बील काढण्याकरीता मुख्याध्यापिका जया चुटे यांनी ५ हजार रुपयाची मागणी केली. त्यापैकी २ हजार रुपये आरोपी परिचर देवराज चिंधालोरे यांच्यामार्फेत स्विकारुन उर्वरीत ३ हजाराची रक्कम पगार झाल्यावर देण्यास सांगितले.
 
 
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जानेवारी रोजी सापळा रचून पडताळणी केली असता आरोपी मुख्याध्यापिका जया चुटे यांनी उर्वरीत ३ हजाराची रक्कम आरोपी परिचर चिंधालोरे यांच्याकडे देण्यास सांगून लाच स्विकारण्याची तयारी दर्शवून लाच स्विकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींविरुध्द सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई पोलिस निरिक्षक उमाकांत उगले यांच्या नेतृत्वात पोलिस निरिक्षक अरविंद राऊत, स.फौ.चंद्रकांत करपे, संजयकुमार बोहरे, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, संगिता पटले, रोहीनी डांगे, दीपक बाटबर्वे यांनी केली.