पत्रकारीतेमधील मुल्यांची जपणूक करीत पत्रकारीता समृद्ध व्हावी

पत्रकार दिन कार्यक्रमातील सूर

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
वाशीम, 
journalist-day-program : पत्रकारीतेमध्ये मूल्य जोपासले गेले पाहिजे. या मूल्यांच्या बळावरच समृद्ध पत्रकारीता करता येते. पत्रकार समाजाचा पाईक म्हणून कार्य करतो. समाजातील विविध समस्यांचा विषयनिहाय उलगडा करतो. पत्रकारांच्या लेखनीमधूनच अशा विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडल्या जाते. या समस्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष जावून तिथे शाश्वत विकास घडतो, असा सूर पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निघाला.
 
 
jk
 
कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी काढले होते. त्यानिमित्त हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने ६ जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
 
 
यावेळी पत्रकार नंदकिशोर नारे, नंदकिशोर वैद्य, सुनील गाडेकर, दत्ता महल्ले, शिखरचंद बागरेचा, अजय ढवळे, सुनील कांबळे, सुनील मिसर, संदीप पिंपळकर, विजय भांदुर्गे, विनोद तायडे, प्रताप नागरे, गजानन पवार, महादेव हरणे, यशवंत पेंढारकर, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयाचे राजू जाधव, रुपेश सवाई, प्रमोद राठोड व अनिल कुरकुटे यांच्यासह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.