ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महाआर्यमान यांचा अपघात

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
शिवपुरी,
Jyotiraditya Scindia's son accident केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महाआर्यमान सिंधिया यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात झालेल्या अपघातात दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी घडली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महाआर्यमान सिंधिया हे शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस विधानसभा मतदारसंघात आयोजित युवा परिषद कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान ते एका महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते.
 
 

Jyotiraditya Scindia 
कार्यक्रमानंतर ते वाहनातून जात असताना आपल्या कारच्या सनरूफमधून बाहेर येऊन उपस्थित नागरिकांचे अभिवादन करत होते. याच वेळी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने महाआर्यमान सिंधिया यांचा तोल गेला आणि त्यांना कारच्या भागाला जोरात धक्का बसला. या धडकेत त्यांच्या छातीला आणि स्नायूंना दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनेनंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच प्रशासन आणि समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात अपघाताचा क्षण स्पष्टपणे दिसत आहे. सध्या महाआर्यमान सिंधिया यांची प्रकृती धोक्याबाहेर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.