अल्लीपुरात दारूभट्ट्या उद्ध्वस्त

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
अल्लिपूर, 
liquor-distilleries-destroyed : अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणार्‍यांवर धडक मोहीम राबविली जात असताना ढोढरी शिवारात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर छापा मारत गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करत ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा गावठी मोहा रसायन सडवा व इतर मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. या कारवाईत शिल्प्या पवार रा.अल्लीपुर ढोढरी शिवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव डॉ. वंदना कारखेले यांच्या निर्देशानुसार सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर, पोलिस हवालदार अजय रिठे, अतुल लभाने, अजय वानखेडे, आकाश कुक्कडकर आदींनी केली.
 
 
 

hjk