अल्पवयीन चोरट्याला अटक; एटीएम कार्ड केले होते चोरी!

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
minor-thief-arrested : एटीएम कार्ड चोरून करून त्यामधील पैसे चोरी करणार्‍या अल्पवयीन बालकाला शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून एटीएम कार्ड व रोख ४० हजार रुपये जप्त करण्यात केले.
 
 
sf
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी म्हसाळा येथील प्रबुद्धनगरातील पवन पंचभाई (२६) यांचे एटीएम कार्ड चोरी गेले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढण्यात आल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्या तक्रारीची दाखल घेऊन ५ रोजी अज्ञात अल्पवयीन बालकाला त्याचा वडिलांच्या समक्ष ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने चोरीचे कबुली केले. चोरीचे एटीएम कार्ड व ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, प्रभारी पोलिस निरीक्षक अजय भुसारे यांच्या निर्देशानुसार, शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा राजेश राठोड, राजेश डाळ, सुरज जाधव, महिला पो. अ. साक्षी चौधरी यांनी केली.