नागपूर,
Student trip शैक्षणिक उपक्रमांचा भाग म्हणून पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल, नीलडोह येथील विद्यार्थ्यांसाठी कोराडी मंदिर, वाकी येथील प्रेक्षणीय स्थळे तसेच द्वारका वॉटर पार्क येथे शैक्षणिक क्षेत्रभेट व सहल आयोजित करण्यात आली होती. या क्षेत्रभेटीत इयत्ता आठवी ते दहावीतील एकूण ९५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी कोराडी मंदिर व वाकी येथील प्रेक्षणीय स्थळांना भेट देत त्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर द्वारका वॉटर पार्कमध्ये उपलब्ध विविध वॉटर स्पोर्ट्सचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. जलपरी, रोप रायडिंग तसेच विविध झुल्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण वेधून घेतले.

सहलीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. सहभोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी, सहकार्य व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. ही सहल मुख्याध्यापक राजेंद्र मरसकोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलप्रमुख शिक्षक राकेश उईके यांनी यशस्वीपणे आयोजित केली. या उपक्रमात शिक्षिका भाग्यश्री कापकर, यमुना नखले, चौधरी, दीप्ती साकल्ले तसेच शिक्षक सुधीर जिचकर, विवेक टेंभरे, रंजीत राऊत व शेषराव नेवारे यांनी विशेष सहकार्य करून क्षेत्रभेट यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. Student trip या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच अनुभवात्मक शिक्षणाचा लाभ मिळाल्याने पालक व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
सौजन्य: राजेंद्र मरसकोल्हे, संपर्क मित्र