गडचिरोली,
anu-naitam : पहिल्या पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत येथील सेमाना बायपास रोडवरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेची इयत्ता आठवीत शिकत असलेली अनु रघुपती नैताम हिने रौप्य पदक पटकाविले असून पटियाला (पंजाब) येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारीला सी. एम. इंटरनॅशनल स्कूल बानेर येथे पार पडलेल्या पहिल्या पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत अनु नैताम हीने इंडियन राउंड या प्रकारात वैयक्तिक रौप्य पदक पटकाविले. पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते रौप्य पदक देऊन तिचा गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धेत मिळालेले घवघवीत यश व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अनु रघुपती नैताम हिचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभु सादमवार, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, श्रीराज बदोले, नाजूक उईके, सुप्रसिद्ध बडकेलवार, गड़चिरोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव डॉ. श्याम कोरडे, सुशील अवसरमोल, पायलेट प्रोजेक्ट धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक रोशन सोळंके, कौमुदी श्रीरामवार, हिमालय शेरखी, अधीक्षक देविदास चोपडे, अधीक्षिका निमा राठोड, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी कौतुक केले असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहे.