परसोडा ग्रामपंचायतद्वारा प्लॅस्टिक बंदीचा अभिनव उपक्रम

ग्रामस्थांना कापडी पिशवीचे वाटप

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
parsoda-gram-panchayat : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानअंतर्गत परसोडा ग्रामपंचायतमध्ये प्लॅस्टिक बंदीचा ठराव घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून ग्रामस्थांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे व राजेश श्रीवास यांच्या उपस्थितीत कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.
 
 
 
y6Jan-Parsoda
 
 
 
गावातून प्लॅस्टिक हद्दपार करण्याकरिता परसोडा ग्रामपंचायतद्वारे प्लॅस्टिक बंदीचा ठराव घेण्यात आला होता. त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी राजेश श्रीवास यांनी ग्रामस्थांना कापडी पिशवीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या हस्ते परसोडा ग्रामपंचायत कार्यालयात कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.
 
 
 
यावेळी गटविकास अधिकारी रमेश खारोडे, विस्तार अधिकारी बघेल, विस्तार अधिकारी ठाकरे, मनरेगा कार्यक्रम अधिकारी जय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तर माजी सरपंच अतुल देशमुख, अरुण देशमुख, मुख्याध्यापक बाबाराव वानखडे, सहायक शिक्षक नारायण वेट्टी, ज्ञानेश्वर मिसाळ, शंकर कोल्हे, गजानन शेळके, पंकज राठोड, स्वप्नील राठोड, कुंदन पवार, कैलास जाधव, अमोल कोल्हे, दादाराव पारधी, भगवान पोटे, रामकृष्ण ढोके, प्रवीण राठोड, राहुल तुवर, रोहिदास तुवर, पुष्पा जाधव, चंदा जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी दिग्विजय मुंडवाईक यांनी केले.