बंगालमध्ये कोणाची सत्ता? फलोदी सट्टा बाजाराची धक्कादायक भविष्यवाणी

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
phalodi-betting-market-on-bengal २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी राज्यातील राजकीय हालचालींनी आत्ताच वेग घेतला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट संघर्ष होण्याचे संकेत मिळत असून, या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील कुप्रसिद्ध फलोदी सट्टा बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 
phalodi-betting-market-on-bengal
 
स्थानिक वाहिन्या आणि सोशल मीडियावर सध्या विविध दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या दाव्यांमध्ये बंगालच्या सत्तासंघर्षाबाबत धक्कादायक अंदाज वर्तवले जात असून, एका प्रमुख पक्षाला आणि प्रभावी नेत्याला मोठा धक्का बसू शकतो, असे भाकीत केले जात आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजार नेमकं काय संकेत देतोय, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. प्रत्येक मोठ्या निवडणुकीआधी फलोदी सट्टा बाजाराचे अंदाज चर्चेचा विषय ठरतात. लोकसभा असो वा विधानसभा, या बाजारातील भाकिते अनेकदा चर्चेत राहिली आहेत. phalodi-betting-market-on-bengal काही वेळा ती वास्तवाच्या जवळ गेल्याचेही उदाहरणे दिली जातात. त्यामुळे २०२६ च्या बंगाल निवडणुकांपूर्वीही अशीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, भाजपा पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा जागांपैकी सुमारे १८० जागा जिंकू शकते. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला ११४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. phalodi-betting-market-on-bengal बहुमताचा आकडा १४८ आहे. मात्र हे अंदाज प्राथमिक स्वरूपाचे असून, परिस्थितीनुसार त्यात मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. राजकीय घडामोडी, पक्षांची रणनीती, जनतेचा कल आणि प्रचारातील वातावरण पाहून फलोदी सट्टा बाजारातील आकडे सतत बदलत असतात. त्यामुळे या भाकितांना अंतिम किंवा अचूक मानणे योग्य ठरणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
फलोदी सट्टा बाजार हा राजस्थानातील फलोदी शहरात कार्यरत असलेला एक अनौपचारिक आणि बेकायदेशीर सट्टेबाजीचा जाळा मानला जातो. ही कोणतीही अधिकृत किंवा सरकारमान्य संस्था नाही. राजकारण, निवडणुका, अर्थसंकल्प, क्रीडा, हवामान आणि सामाजिक घडामोडींवर येथे बेटिंग केली जाते. पूर्वी हवामान आणि शेतीशी संबंधित अंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या बाजाराने कालांतराने राजकीय भाकितांकडेही वळण घेतले. phalodi-betting-market-on-bengal येथील बुकमेकर्स मीडिया रिपोर्ट्स, वृत्तपत्रांतील बातम्या, राजकीय सभा-रॅलींमधील गर्दी, जमिनीवरील प्रतिसाद आणि त्यांच्या गुप्त नेटवर्कमधून मिळालेल्या माहितीनुसार शक्यता ठरवतात. फोन कॉल, मेसेजिंग अ‍ॅप्स आणि संकेतशब्दांच्या माध्यमातून सट्टेबाजी चालते आणि वेळोवेळी आकडे बदलले जातात.
अधिकृत पातळीवर भारतात सट्टेबाजी बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोग, गृह मंत्रालय आणि राज्य पोलीस यंत्रणांनी वारंवार स्पष्ट केले आहे की निवडणुकांचे निकाल केवळ मतदान आणि मतमोजणीद्वारेच ठरतात. फलोदी सट्टा बाजारातील दाव्यांना कोणतीही कायदेशीर मान्यता नाही आणि ते अधिकृत अंदाज मानले जाऊ शकत नाहीत. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका अनेक टप्प्यांत पार पडल्या होत्या. phalodi-betting-market-on-bengal २९२ जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान झाले आणि २ मे २०२१ रोजी निकाल जाहीर झाले. त्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकत सत्तेवर मजबूत पकड कायम ठेवली होती, तर भाजपने ७७ जागा जिंकून राज्यात पहिल्यांदाच मोठी झेप घेतली होती.
आता २०२६ च्या निवडणुकांकडे पाहता, राजकीय चित्र कसे बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, फलोदी सट्टा बाजाराचे अंदाज कितपत खरे ठरतात, याची उत्सुकता कायम आहे.