नागपूर,
traffic-congestion : अजनी रेल्वे स्थानकासमोरील मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने अजनी रेल्वे स्थानकाजवळ नवीन अंडरपास बांधल्या जाणार आहे. या अंडरपाससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित कंपणीला कंत्राट दिल्या जाणार आहे.
रेल्वे स्थानकाजवळ जुन्या पूलाची आयुमर्यादा संपल्यामुळे नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मेडीकल चौक मार्गे अजनी आणि काँग्रेसनगर, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मार्गावर जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सकाळ, सायंकाळी जुन्या पूलाच्या मार्गावर वाहतूकीची कोंडी आता नित्याची बाब झाली आहे. वंजारी नगर मार्गे काँग्रेसनगरकडे येत असलेल्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अजनी रेल्वे स्थानकासमोरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नवीन अंडरपास उपयोगी ठरेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंडरपास बांधण्याचे काम संबंधित कंपणीला कंत्राट दिल्या जाणार आहे. या अंडरपाससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित कंपणीला दिल्यानंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात केल्या जाणार आहे. अंडरपासकरिता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आगामी एक महिन्याभरात कामास सुरूवात होण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. नव्या अंडरपासमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.
अंडरपासच्या बांधकामासाठी २८ कोटी
अंडरपासच्या बांधकामासाठी २८ कोटी रुपये खर्च होणार अंडरपासच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर किमान दोन वर्षांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जे.पी. एंटरप्रायझेस या कंपणीला काम सोपविल्याने दोन वर्षांत अंडरपासचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
अंडरपास ७ मीटर रुंद, ६० मीटर लांब
राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून हा नवीन अंडरपास तयार केल्या जाणार आहे. वर्धा रोड कृपलानी चौक अजनी आरओबी मार्गे वंजारी नगर पर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूकीची कोंडीपासून सुटका करण्यासाठी अजनी रेल्वे स्थानकाजवळ अंडरपास बांधल्या जाणार आहे. सध्याचा रस्ता कायम राखून नवीन अंडरपाचा मार्ग तयार झाल्यानंतर एफसीआय वेअरहाऊसमध्ये थेट प्रवेश मिळेल. हा अंडरपास ७ मीटर रुंद, ६० मीटर लांब आणि ८ फूट उंच असेल. हे काम सार्वजनिक बांधकाम देखरेखीखाली केले जाईल.
टीबी वॉर्डपर्यंतचा रस्ता सहा पदरी
याशिवाय विविध विकास प्रकल्पांतर्गत, अजनी आरओबी ते टीबी वॉर्डपर्यंतचा मार्ग चार पदरी असल्याने हा रस्ता आता सहा पदरी सिमेंट रस्ता बांधल्या जाणार आहे. यासाठी रेल्वेची जमीन संपादित केली जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनासोबत सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पत्रव्यवहार केल्या जात आहे. मध्य परवानगी मिळाल्यानंतर रस्त्यांचे काम सुरु होणार आहे.