व्हेनेझुएलानंतर ट्रम्पचा ग्रीनलँडवर दावा!

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's claim on Greenland अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडला जोडण्याच्या त्यांच्या धोरणात्मक इच्छेचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी सांगितले की ग्रीनलँडचे स्थान आणि खनिजसंपदा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत, आणि त्यामुळे त्यांचे हे धोरण गंभीर असून यासाठी कोणतीही पायपीट करण्यास ते तयार आहेत. ट्रम्पच्या विधानावर डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स फ्रेडरिक निल्सन यांनी म्हटले की, ग्रीनलँडचे भविष्य केवळ आंतरराष्ट्रीय कायदा आणि योग्य राजनैतिक माध्यमांद्वारे ठरवले जाऊ शकते. कोणत्याही दबावाखाली किंवा जबरदस्तीने निर्णय होऊ शकत नाही. डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सेन यांनीही स्पष्ट केले की अमेरिकेला डॅनिश प्रादेशिक भागांवर हक्क नाही आणि ग्रीनलँड हे नाटोचा सदस्य असल्याने संरक्षण करार आधीच अस्तित्वात आहे.
 
 
Trump
 
 
ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी देखील डेन्मार्कच्या बाजूला उभे राहून म्हटले की, फक्त ग्रीनलँड आणि डेन्मार्कच ग्रीनलँडच्या भविष्याचा निर्णय घेऊ शकतात; कोणत्याही तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. अलीकडेच अमेरिका व्हेनेझुएलामध्ये केलेल्या लष्करी कारवाईनंतर, ग्रीनलँडसंदर्भातील ट्रम्पचे विधान आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे कारण बनले आहे. अमेरिकेच्या सल्लागार स्टीफन मिलर यांच्या पत्नीने सोशल मीडियावर अमेरिकन ध्वजाच्या रंगात ग्रीनलँडचा नकाशा पोस्ट करून लवकरच असे कॅप्शन दिले, ज्यामुळे वाद आणखी तीव्र झाला. तथापि, युरोपियन युनियनच्या प्रवक्त्या पॉला पिन्हो यांनी ट्रम्पच्या विधानावरील दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. ग्रीनलँड आणि डेन्मार्कचे भविष्य केवळ संबंधित देशांच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि कोणत्याही तिसऱ्या देशाचा त्यात हस्तक्षेप होऊ शकत नाही.