नागपूर,
vinayak deshpande इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बूक ऑफ रेकॉर्डने सन्मानित, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व विनायक काशिनाथ देशपांडे यांना पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानतर्फे यंदाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ रविवार, ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता, श्रीराम सभागृह, रामनगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
संस्थापक व प्रेरणास्थान असलेल्या शुभांगी भडभडे यांनी स्थापन केलेल्या पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानचा हा मानाचा पुरस्कार असून, नलिनी बाळकृष्ण देवपुजारी पुरस्कृत जीवन गौरव पुरस्काराचे हे २६ वे वर्ष आहे.
मराठी समाजातील विविध क्षेत्रांत सातत्याने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्वक दिला जाणारा हा पुरस्कार यंदा विनायक देशपांडे यांना जाहीर झाल्याने सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विनायक देशपांडे हे नवीन संसद भवन निर्मिती प्रकल्पाचे प्रमुख प्रेरक सल्लागार म्हणून कार्यरत असून, त्यांच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.vinayak deshpande या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान कालिदास संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ संपादक विजय फणशीकर, तर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर गिरीश सहस्त्रभोजनी उपस्थित राहणार आहेत. साहित्य, कला, समाजकार्य व वैचारिक क्षेत्रातील रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या आयोजकांनी केले आहे.