वर्धा,
chinmaya-mission-amrit-gaurav-yatra : चिन्मय मिशन संस्थेच्या सोहळ्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुणे येथुन काढण्यात आलेली अमृत गौरव यात्रा शुक्रवार ९ रोजी सकाळी १० वाजता येथील साई मंदिरात येत आहे. यासह चिन्मय मिशन कार्याचा गौरव दर्शविणारी प्रदर्शनीही सोबत येत आहे.
महाराष्ट्रात या यात्रेचे नेतृत्त्व स्वामी अनुकुलानंद, कोईम्बतूर, स्वामी प्रत्यानंद, नांदेड, ब्रह्मचारिणी तारिणी चैतन्या, युवा वर्गाचे प्रशिक्षित विद्यार्थी नेतृत्त्व करीत आहे. वर्धेत या यात्रेचे स्वागत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल. यावेळी चिन्मय सेवा सदन ट्रस्टचे पदाधिकारी डॉ. मीना राव, अरुणा कुळकर्णी, ब्रह्मचारी सुचेत चैतन्य, चिन्मय साधना केंद्र पवनार प्रमुख स्वामीनी भद्रानंदा उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला सर्व साधकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चिन्मय मिशनचे अध्यक्ष सुरेश भडांगे व सचिव प्रदीप अग्निहोत्री यांनी केले आहे.