वर्धा,
sand-smuggling : रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक करणार्याला सावंगी पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून ट्रँटर, ट्राँली, रेती असा ७ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मध्यरात्री पालोती मार्गावर करण्यात आली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सावंगी (मेघे) येथील पोलिस रात्री गस्तीवर असताना ३ वाजताच्या सुमारास पालोती मार्गावर एम. एच ३२ एएच २३५७ व नंबर नसलेल्या ट्राली सावंगीकडे येताना दिसला. चालकास थांबवून पाहणी केली असता ट्रँटरमध्ये रेती आढळून आल्याने चालक सौरभ येनुरकर (२७) रा. नंदपूर ता. समुद्रपूर यांच्या ताब्यातून ट्रॅटर, ट्राँली किंमत ७ लाख रुपये, रेती असा ७ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चालक सौरभ येनुरकर रा. नंदपूर व ट्रँटरचा मालक शाहीद खान पठाण रा. सालोड (हिरापूर) यांच्याविरुद्ध सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सहा. पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, पोउपनि विशाल डोणेकर, पोलिस हेड काँन्स्टेबल संजय पंचभाई, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव यांनी केली.