आर्वी,
sumit-wankhede : आर्वी, आष्टी, कारंजा (घा.) तालुयात अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यासाठी राज्य शासनाने १२ कोटी ३८ लाख ९१ हजार ३०० रुपयांचे विशेष मदत पॅकेज राज्य शासनाने जाहीर केले. त्यामुळे मतदारसंघातील ८ हजार ९९९ शेतकर्यांना थेट मोठा दिलासा मिळणार आहे. मतदार संघातील नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकर्यांना लाभ मिळावा यासाठी आ. सुमित वानखेडे यांनी शासन दरबारी तगादा लावला होता.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आ. सुमित वानखेडे यांनी संत्रा उत्पादक शेतकर्यांची व्यथा सभागृहात आक्रमकपणे मांडली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे मृग बहार गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकर्यांच्या या नुकसानीची भरपाई विशेष बाब म्हणून मिळावी यासाठी आ. वानखेडे यांनी सरकारकडे आग्रह केला होता. त्यांनी पोट तिडकीने केलेल्या मागणीची दखल घेत ११ डिसेंबर २०२५ रोजी संत्रा उत्पादक शेतकर्यांना विेशेष पॅकेज देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले होते. नव्या वर्षात ६ जानेवारी रोजी त्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
या शासन निर्णयानुसार आर्वी, कारंजा आणि आष्टी या तीन तालुयातील ३१५ गावांमधील ५,५०६ हेटर बाधित क्षेत्रातील शेतकर्यांना ही मदत मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मदतीची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. संत्रा बागायतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मतदारसंघातील शेतकर्यांनी आमदार सुमित वानखेडे यांचे आभार मानले आहेत.
मदत कर्ज खात्यात वळती होणार नाही : आ. वानखेडे
आपल्या मतदार संघातील संत्रा उत्पादक शेतकर्यांना निधीचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण अट घातली आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी मिळालेली ही मदत बँकांनी शेतकर्यांच्या जुन्या कर्ज खात्यात वळती करू नये किंवा त्यातून कर्ज वसुली करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकार्यांमार्फत बँकांना देण्यात आल्या आहेत. राज्य शासन आपल्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास या निमित्ताने शेतकर्यांचा ठाम होईल, असे आ. वानखेडे यांनी सांगितले. शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण आग्रही आहोत, असेही आ. वानखेडे म्हणाले.