बांगलादेशात जमावापासून वाचण्यासाठी पाण्यात उडी; हिंदू तरुणाचा बुडून मृत्यू

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
ढाका,  
hindu-youth-jumped-into-water-and-drowned बांगलादेशातील नौगाव जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून जमावाने पाठलाग केलेल्या एका हिंदू तरुणाने जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. मृताचे नाव मिथुन सरकार असे आहे. नौगावचे पोलिस अधीक्षक मोहम्मद तारिकुल इस्लाम यांनी सांगितले की, मिथुनवर चोरीचा आरोप होता.
 
hindu-youth-jumped-into-water-and-drowned
 
या आरोपामुळे काही लोकांनी त्याचा पाठलाग केला. जमावापासून वाचण्यासाठी मिथुनने जवळच्या पाण्यात उडी मारली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. hindu-youth-jumped-into-water-and-drowned पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी शवविच्छेदन केले आहे आणि तपास सुरू केला आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा बांगलादेशमध्ये आधीच अशांतता आहे. डिसेंबरमध्ये विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. तेव्हापासून हिंदू समुदायावर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत.
१८ डिसेंबर रोजी हादीच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर पहिली मोठी घटना घडली. ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली जमावाने दिपू चंद्र दास नावाच्या हिंदू व्यक्तीची मारहाण करून हत्या केली. hindu-youth-jumped-into-water-and-drowned हा आरोप नंतर खोटा ठरला. जमावाने दिपूचा मृतदेह झाडाला बांधला आणि तो जाळून टाकला. अलीकडेच, नरसिंगडी शहरात ४० वर्षीय हिंदू किराणा दुकानदार मोनी चक्रवर्तीची हत्या करण्यात आली. स्थानिक माध्यमांनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली. मोनी चक्रवर्ती हा चारसिंधूर बाजारात दीर्घकाळ दुकान चालवत होते. अलिकडच्या आठवड्यात तो तिसरा हिंदू व्यापारी होता ज्याची हत्या झाली. तसेच, हिंदू व्यापारी आणि एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक राणा प्रताप बैरागीची जेसोर जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तो कपालिया बाजारात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली. तो ३८ वर्षांचे असल्याचे वृत्त आहे.