कोरची,
ganja seizure news, गांजा उगवून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक व कोरची पोलिसांनी सोमवार, 5 जानेवारी रोजी तालुक्यातील हितकसा येथे छापा मारून 15 लाख 19 हजार 550 रुपये किमतीचा 30 किलो गांजा जप्त केला. पुनाराम अलिसाय मडावी (45) रा. हितकसा असे गांजा आढळलेल्या आरोपीचे नाव आहे.
हितकसा येथे ganja seizure news, सोमवारी छापा मारून पुनाराम मडावी याच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीत 30 किलो 375 ग्रॅम गांजा जप्त आढळला. कारवाईस्थळी ओली झाडे, अर्धी वाढलेली झाडे, फुले, पाने आणि बॉड यांचा समावेश होता. या गांजाचा अंदाजे बाजारभाव 15 लाख 19 हजार 750 रुपये आहे. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी तत्त्वावर गांजा उगवला आणि मानवी आरोग्यावर व मनोगत व्यवहारावर परिणाम करणारे औषध द्रव्य अवैधरीत्या तयार केले होते. ही कारवाई एसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौंड, कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, नायब तहसीलदार गणेश सोनवानी यांनी केली.