वातावरण तापले! माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
संभाजीनगर,
Imtiaz Jalil महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान संभाजीनगरमधील बायजीपुरा भागात मुस्लीम समाजात वर्चस्व असलेल्या एमआयएमच्या माजी खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची मारहाण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पदयात्रा करताना कार्यकर्त्यांमधील भांडणामुळे या भागातील वातावरण तणावपूर्ण झाले.
 

Imtiaz Jalil -assault-mim-sambhajinagar-election 
जलील यांच्या पदयात्रेवर नाराज कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आणि कार थांबवून त्यावर बुक्या आणि पायांनी हल्ला केला. या हल्ल्यात जलील यांनाही मारहाण झाली. घटनास्थळी दोन गटांमध्ये जोरदार राडा आणि हाणामारी झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
 
 
एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये Imtiaz Jalil  सुरू झालेल्या या वादाचे कारण तिकीट न मिळाल्याशी संबंधित असण्याची माहिती समोर येत आहे. काही स्थानिकांनी दहा-बार वर्षे एमआयएमसाठी काम केले असून त्यांना तिकीट न दिल्याने नाराजी व्यक्त केली, असे एका बंडखोर कार्यकर्त्याने सांगितले. या विरोधामुळे जलील यांना पदयात्रा वळवून दुसऱ्या गल्लीत घेऊन जावे लागले, मात्र विरोध करणारे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन त्यांच्या मागे फिरत होते.छत्रपती संभाजीनगर शहरातील मुस्लीम बहुल भागांमध्ये 2014 पासून एमआयएमला मजबूत पकड असली तरी, सध्या या भागातच विरोध वाढल्याचे दिसून येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी सांगितले की, "सोळा तारखेला हा विरोध अधिक स्पष्टपणे दिसेल," असे त्यांनी नमूद केले.या घटनेमुळे संभाजीनगरमधील निवडणूक प्रचाराचे वातावरण तणावपूर्ण झाले असून, पुढील काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज भासल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.