1500 रुपये खात्यात येणार नाही सरकारची 'कडक कारवाई'

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
बुलढाणा,
Maharashtra ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभ घेण्यास पात्र नसतानाही अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील 196 कर्मचाऱ्यांची यादी समोर आली आहे ज्यांनी योजनेचा लाभ घेतला.
 

Maharashtra ladki bahin yojana 
चौकशीच्या अहवालानुसार,Maharashtra ladki bahin yojana या 196 महिलांपैकी 190 अर्धवेळ कर्मचारी असून त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्यामुळे ते योजनेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र उर्वरित 6 कर्मचाऱ्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांनी नियम मोडून योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले.संबंधित ६ कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या ₹99 000 रकमेची वसुली करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून प्रत्येकी ₹16 000 रक्कम वसूल करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच नियमभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी स्पष्ट केले होते की, लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. तरीही काही कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे शासनाची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली.याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, योजनेचा लाभ घेण्याचे निकष स्पष्ट असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.