मुंबई,
sanjay raut राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाची तापलेली हवे अधिकच गरम झाली आहे. प्रचाराचा धुराळा उडालेला असून नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपांची बोंबाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी ‘युती’ केली असून, तब्बल दोन दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत.
मुंबईत मराठी महापौर आणि मराठी मतांसाठी दोन्ही नेते मागील वैर विसरून पुन्हा एकत्र आले आहेत. यामुळे राज्यातील राजकारणाच्या कंगोऱ्यात मोठी हलचाल झाली आहे. या दोन्ही नेत्यांची संयुक्त मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरली असून याचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी या युतीला पसंती दर्शवली आहे.याबाबत खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधत स्पष्ट मत मांडले. खासदार राऊत म्हणाले, “संयुक्त मुलाखतीसाठी पत्रकारांना बसवलं होतं, दोन धुरंदर एकत्र आले आहेत. मुलाखतीत देणारे आणि घेणारे दिसले. ही मुलाखत महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राला जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, त्या प्रश्नांवर त्यांनी आपली मतं मांडली.”
त्यांनी पुढे सांगितले, “आता नाहीतर कधी नाही. मुंबई हातून गेली तर पुन्हा येणार नाही. मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाची डेथ वॉरंट काढली जात आहे. फडणवीस राज्य वाऱ्यावर सोडून फिरत आहेत, अजित पवार आणि शिंदे यांनी राज्य वाऱ्यावर सोडले. अशा परिस्थितीत सरकारमधून त्यांना दूर करावे.”
राज्यातील अनेक sanjay raut ठिकाणी ठाकरे बंधूंची युती स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन झाली असून, त्यावर टीका देखील होत आहे. भाजपने यावर जोरदार टीका केली असून, या युतीला संधीसाधू असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र, भाजपकडून अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये MIM सोबत आघाडी करून विरोधकांना चकमा देण्याचा राजकीय खेळ सुरू आहे.खासदार राऊत म्हणाले, “भाजपने MIM ला पाठिंबा दिला, अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. तर अकोल्यामध्ये MIM ला पाठिंबा दिला आहे. ओवेसी काँग्रेससोबत चुंबा चिंबी सुरु आहे, हे दुतोंडी गांडुळ आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी उघड युती, कुठे छुपी युती आहे. काँग्रेमुक्त भारत घडवायचं होतं, पण त्यांनी युती सुरू केली आहे.”
त्यांनी भाजपवर sanjay raut थेट हल्ला करून सांगितले, “राज्यात भाजप ब्लॅकमेलिंगचं राजकारण सुरू ठेवलं आहे. शिंदे आणि अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केले जात आहे. हे ब्लॅकमेल करणारे आणि गँगस्टर आहेत. यांना राज्याचे हित नाही, सावकारांचे विचार नाहीत.”स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसमोर ठाकरे बंधूंची युती आणि भाजपची रणनीती यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती अधिकच तापली आहे. आगामी निवडणुकीत या युतीचा आणि विरोधकांच्या रणनीतीचा परिणाम कसा दिसतो, हे पुढील काळात स्पष्ट होईल.