तभा वृत्तसेवा
हदगाव,
Manatha police, माळझरा येथील मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी 1.30 वाजता, बेकायदेशीर ‘तिर्रट’ हा जुगार सुरू असल्याची माहिती मनाठा पोलिसांना मिळाली. त्यानुसार मनाठा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गिरी, जमादार अशोक दाढे, कृष्णा यादव, रेणू प्रसाद भोपाळकर व बालाजी रावले यांनी केलेल्या कारवाईत पाच आरोपींना घटनास्थळी पकडण्यात आले.
या कारवाईत सोपान लक्ष्मण नाईक (वय 58, गायतोंड), अकुंश शिवाजी खोकले (वय 23, माळझरा), सुभाष श्रीराम मेंडके (वय 42, माळझरा), राहुल तुकाराम सोळंके (वय 27, मनाठा) व तुकाराम साहेबराव मिरटकर (वय 32, गायतोंड) यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून 1 हजार 200 रुपये रोख रक्कम, पाच दुचाकी वाहने व जुगाराचे साहित्य असा सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशोक दाढे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी करीत आहेत.