नागपूर,
electrical-expo : द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि महाराष्ट्रातील ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त ९ ते ११ जानेवारी दरम्यान डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात विद्युत एक्स्पो २०२६चे आयोजन करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मानापुरे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी प्रफुल्ल मोहोड, देवा ढोरे, अविनाश खैवाले, रमेश कनोजिया उपस्थित होते.
विद्युत एक्सपोचे उद्घाटन डॉ. वसंतराव देशपांडे परिसर येथे शुक्रवार, ९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. या प्रसंगी एमएसईडीसीएलचे संचालक (ऑपरेशन्स) सचिन तालेवार, कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दिलीप डोडके, एस. डी. अने, मनोहर पोटे, संभाजी माने उपस्थित राहणार आहे.
विद्युत एक्स्पोत विद्युत उपकरणांचे प्रसिद्ध उत्पादक, आणि विक्रेते, तसेच विद्युत क्षेत्रातील तज्ञ सहभागी होणार आहे. पारंपारिक आणि अपारंपारिक दर्जाची नवीन उपकरणे विद्युत एक्स्पोत राहणार आहे. सुरक्षित तंत्रज्ञानावरील चर्चासत्रे होईल. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणारे अभियंते, कंत्राटदार, तंत्रज्ञ यात सहभागी होणार आहे. जिल्हा वीज संघटनांचे प्रतिनिधी आणि सदस्य यांच्यासह कंत्राटदार सुध्दा सहभागी होईल. सर्व अभियांत्रिकी विद्युत एक्स्पो मध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.