निलोफर साजिद बेग गटनेतेपदी बिनविरोध

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

आर्णी,
Arni Nagar Parishad,राष्ट्रवादी काँग्रेस (अप) च्या आर्णी नगर परिषदेतील नवनीर्वाचित गटनेतेपदी निलोफर साजिद बेग यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व नगरसेवकांनी एकमताने निलोफर बेग यांच्यावर विश्वास व्यक्त करून गटनेतेपदी निलोफर बेग यांची निवड केली.
 

Nilofar Sajid Beg, unopposed leader, Arni Nagar Parishad, 
या गटनेतेपदी निवडीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनियुक्त नगरसेवक उपस्थित होते. निलोफर बेग या सामाजिक कार्यात सक्रिय असून समन्वयाच्या जोरावर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्ष संघटन ही निवड केवळ माझी नसून आर्णीतील जनतेचा विश्वास व माझे पती साजिद बेग यांच्या मार्गदर्शनामुळे मिळालेल्या यशाचे फलित आहे. आठ जागांवर मिळालेला विजय हा जनतेच्या अपेक्षांचा कौल आहे. शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन निष्ठेने काम करेन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित गटनेते निलोफर साजिद बेग यांनी व्यक्त केली.