नागपूर,
Rashtra Sevika Samiti राष्ट्रसेविका समितीतर्फे मकर संक्रांत उत्सव नेल्को सोसायटीतील सफायर ग्राउंड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण भव्य पथसंचलन होते. या पथसंचलनात आठ वर्षांच्या मुलींपासून ते ७५ वर्षांपर्यंतच्या सेविकांनी सहभाग घेतला. नातीपासून आजीपर्यंतच्या सेविकांच्या शिस्तबद्ध पथसंचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी इनु मुजुमदार होत्या. त्यांनी देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या सर्व लहान-मोठ्या सेविकांचे मनापासून कौतुक केले. प्रमुख वक्त्या अलका इनामदार यांनी आपल्या भाषणात घोष आणि गणवेशाचे पथसंचलनात असलेले महत्त्व स्पष्ट केले. Rashtra Sevika Samiti गणवेशामुळे देशसेवेची भावना निर्माण होते, तर घोषाच्या तालावर पावले आपोआप पुढे पडतात, असे त्यांनी सांगितले. ‘वंदे मातरम्’च्या घोषणेसह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले.
सौजन्य: मीनाक्षी देशपांडे, संपर्क मित्र