हिंगणघाट,
nayana-tulaskar : बालपणापासून संघ विचाराची आपण पाईक राहिले असून तेच विचार आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर म्हणाल्या. त्या हिंगणघाट तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन निमित्त ६ रोजी बेघर निवारा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात त्या अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नप मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, साहित्यिक व सत्कार मूर्ती मनीषा रिठे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश वणीकर उपस्थित होते.

त्यापुढे म्हणाल्या की, निवडून आल्यानंतर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सारख्या विचारशील व कृतिशील पत्रकारांच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे सौभाग्य मिळाल्याबद्दल आनंद व्यत केला. लवकरच जागेचा शोध घेऊन पत्रकार भवन निर्माण करून देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केले. तसेच त्यांनी आगामी पाच वर्षात करावयाच्या विकास कामांचे ब्ल्यू प्रिंट सादर केले. नगराध्यक्ष म्हणून जी जी योग्य कामे आहेत ती आपण प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पर्यावरण उत्तम ठेवण्यासाठी जनतेनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे व पाण्याची बचत करा तसेच नपला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकशाहीचा चौथ्या स्तंभामुळे आपल्याला शहरातील विविध समस्यांची माहिती मिळत आहेत.
पत्रकारांनी या समस्या मांडत असताना सकारात्मता दाखवावी तसेच समाजाच्या भल्यासाठी येथील पत्रकारांनी सकस लिखान करून समाजाचे उद्बोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी नप मुख्याधिकारी उरकुडे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.या प्रसंगी साहित्यिक सौं मनिषा रिठे यांचा व डॉ. पंजाबराव देशमुख कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार अजय मोहोड, महिला पत्रकार हर्षाली सातघरे, आश्रय बेघर शहरी निवाराचे अध्यक्ष लीलाधर मडावी, नगरसेवक दिनेश वर्मा, वृत्तपत्र विक्रेता संघाचे हिवंज, गजानन शेंडे, विजय रिठे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक प्रा. अजय मोहोड यांनी केले. संचालन राजेंद्र राठी यांनी केले. नरेंद्र हाडके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार विजय राठी, अनिल कडू, सतीश वखरे, अनिल अवस्थी, दशरथ ढोकपांडे, संजय अग्रवाल, अब्बास भाई, गजानन इंगळे, चेतन वाघमारे, आदी पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.