बुलढाणा,
sanjay-gaikwad : वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून आ. संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून ज्ञानगंगा अभयारण्यात पीकेटी—०७—सीपी—०१(धुरंदर) या नर पट्टेदार वाघाचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव रेड्डी यांच्याशी सखोल व महत्त्वपूर्ण चर्चा करून आ. संजय गायकवाड यांनी हा उपक्रम मार्गी लावला. पांढरकवडा (यवतमाळ) येथून नर वाघाला बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पुनर्वसनासाठी आणण्यात आले. या वाघासाठी सुरक्षित व नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासाठी बोथा जंगलातील देव्हारी गावाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात आले. यासाठी तब्बल ६८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून येथील सर्व नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. परिणामी या संपूर्ण परिसरातील मानवी हस्तक्षेप शून्यावर आला असून, हे क्षेत्र भविष्यात संरक्षित वाघ अधिवास म्हणून विकसित होणार आहे. येत्या काळात त्याची मादी बहीण (वाघीण) पैनगंगा अभयारण्यात सोडण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
दि. ६ जानेवारी रोजी आ. संजय गायकवाड तसेच बुलढाणा नगराध्यक्षा पूजा गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांसमवेत या नर वाघाच्या संरक्षित अधिवासाला भेट दिली. यावेळी वाघाच्या दैनंदिन हालचाली, आरोग्य व सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती घेऊन कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान नगरपालिका गटनेते युवानेते मृत्युंजय गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे,तारापूरचे सरपंच प्रवीण जाधव, निषाद येरमुले, मंगेश बिडवे, ज्ञानेश्वर खांडवे,वनविभागाचे अधिकारी राठोड, काळे ,दीपेश लोखंडे, प्रकाश सावळे, श्रीकृष्ण बोबडे, फॉरेस्ट गार्ड, श्रीधर अंभोरे यांच्यासह वनरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.