आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळून लावली!

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
The ICC has rejected Bangladesh's request आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ संदर्भात बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील मतभेदांवर अखेर आयसीसीने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. भारतात होणाऱ्या सामन्यांबाबत बांगलादेशने व्यक्त केलेली सुरक्षा विषयक चिंता आयसीसीने फेटाळून लावली असून, बांगलादेशी संघासाठी भारतात कोणताही ठोस धोका असल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलविण्याची मागणी स्वीकारण्यात आलेली नाही.
 
 
 rejected Bangladesh
 
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी ६ जानेवारी रोजी आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत आयसीसीकडून स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले की, भारतात खेळताना बांगलादेशी खेळाडूंना धोका असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत सुरक्षा मूल्यांकन किंवा अहवाल सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्पर्धेच्या नियोजित वेळापत्रकात किंवा ठिकाणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे आयसीसीने ठामपणे नमूद केले. आयसीसीच्या या निर्णयामुळे बांगलादेशला मोठा धक्का बसला असून, आगामी टी-२० विश्वचषक भारतातच नियोजनानुसार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.