विनायक म्युझिक ग्रुपचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Vinayak Music Group अग्रगण्य विनायक म्युझिक ग्रुप अँड अकॅडमी यांच्या वतीने सक्करदरा येथील व्हेंचर सभागृहात सुमधुर गीतांचा भव्य संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम ग्रुपचे संस्थापक नंदकिशोर मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
 
Vinayak Music Group
 
यावेळी ग्रुपचे सह-संस्थापक शैलेश मुधोळकर, स्नेहा जोशी तसेच संरक्षक संजय जाधव हे आवर्जून उपस्थित होते. याशिवाय मान्यवर पाहुणे म्हणून बाबुराज पवार, ‘व्हॉइस ऑफ किशोरकुमार’ म्हणून प्रसिद्ध असलेले अनुप कांबळे, प्रशांत लोखंडे, डॉ. लीना कोहळे, गौरी बावडेकर, सुनील कठाळे, गजेंद्र डोळके, राजेंद्र चांद्रायण आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. Vinayak Music Group या कार्यक्रमात एकूण त्रेपन्न कलाकारांनी आपल्या गायनकलेचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. दुपारी १ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत चाललेल्या या अविस्मरणीय कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व कलाकार व रसिकांनी नंदकिशोर मुळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले.
सौजन्य: गजेंद्र डोळके, संपर्क मित्र