विरंगुळा ज्येष्ठ महिला मंडळाचा २७ वा वर्धापन दिन

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Virangula Senior Women's Group विरंगुळा ज्येष्ठ महिला मंडळाचा २७ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम दोन दिवसांचा घेण्यात आला होता.१ ल्या दिवस लक्ष्मीनगर येथील सिद्ध हनुमान मंदिराच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नीलम पर्वते उपस्थित होत्या. त्या गेल्या २० वर्षांपासून “भारतीय स्त्री शक्ती” या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असून सध्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या संघटनेच्या सामाजिक कार्याची माहिती ज्येष्ठ महिलांना दिली. याच प्रसंगी गतवर्षातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप सहभोजनाने झाला.

doke
 
२ ऱ्या दिवशी मंडळातर्फे सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात “सुखांत” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. हा प्रयोग Virangula Senior Women's Group इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थानिक शाखेतील डॉक्टरांनी रमेश लखमापुरे यांच्या दिग्दर्शनाखाली सादर केला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशा गोखले, रजनी निंबाळकर, चित्रा डोके, विजया विघ्ने, अनघा फडके तसेच मंडळाच्या कार्यकारिणीतील सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य :संजीव डोके,संपर्क मित्र