विघ्नहर्त्याच्या दर्शनाला वाहतूक पोलिसांचे विघ्न!

*दिसेल त्याला चालान

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
सेलू,
siddhi-vinayak-keljhar : अंगारकी चतुर्थी, नववर्षातील परिसरातील पहिली यात्रा असल्याने भाविकांना दर्शनाची ओढ पाहता सिद्धी विनायकाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून भाविक केळझरनगरीत पहाटेपासून येऊ लागले. ही आयती संधी शोधत ज्या ठिकाणी कधीही वाहतूक पोलिस राहत नाही त्या ठिकाणी उभे राहून अनेक वाहनधारकांना चालण देण्यात आले. त्यामुळे गणेशाचे दर्शन दान पेटीतील देणगी पेक्षा महाग पडल्याची भावना अनेक भाविकांनी व्यत केली.
 
 
K
 
 
केळझर ते जुनगड जाणार्‍या रस्त्यावरून सरळ सिद्धी विनायक देवस्थानमध्ये वस्तीतून जाणार्‍या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी ठिय्या मांडला. मंदिराच्या दिशेने निघताच हात देत वाहन थांबविण्यात येत होते. कोणतेही कारण देत ५०० रुपयांची चालान ठोकण्यात येत होते. हे पाहून वाहनधारकांनी मंदिराच्या दान पेटीत दान देण्यापासून हात तर आखूड घेतला नाही ना असे बोलल्या जात होते. भाविकांना टारगेट करण्यापेक्षा महामार्गावर उभे राहून वाहतूक पोलिसांनी आपले कर्तव्य का बजावले नाही. वस्तीतील रस्त्यावर चालान देणे कितपत योग्य आहे असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी व नव वर्षात आपण दर्शन घ्यावे ही भावना मनात घेऊन जाणार्‍या भाविकांनाच पोलिसांना आधी चालान स्वरूपात देणगी द्यावी लागावी अन् नंतर दर्शनासाठी जावे लागले.
 
 
सेलू शहरात मुख्य रस्त्याने तीबल सिट, बेधुंद वाहने धावतात मेडिकल चौकातून धावणारे ऑटोमधील गर्दी न दिसणार्‍या वाहतूक पोलिसांना केळझर येथील भाविकांची वाहनं दिसावी या विषयी आश्चर्य व्यत करण्यात येत आहे. येथे मोठ्या प्रमाणात स्वयंपाक होतात. श्रीचा प्रसाद घेण्यासाठी भाविक तेथे आले होते. पण, अनेकांना दिलेल्या चालानची चर्चा भाविकांमध्ये होती.