५ महिन्याच्या गर्भवती पत्नीला पती घेऊन गेला हनिमूनला, रोमान्सच्या क्षणी रक्तस्त्राव आणि...

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
टोकियो,  
malaysia-viral-news डॉक्टर गर्भवती महिलांना सतत काळजी घेण्याच्या सूचना देत असतात, मात्र त्या दुर्लक्षित केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना मलेशियातील एका जोडप्याच्या बाबतीत घडली आहे. गर्भात अवघ्या पाच महिन्यांचे बाळ असताना परदेशात हनिमूनला जाण्याचा निर्णय या जोडप्याला चांगलाच महागात पडला असून, वेळेआधी झालेल्या प्रसूतीमुळे बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
 
malaysia-viral-news
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुकिट मेर्टाजम येथील लियांग ची लियांग (वय ३२) आणि त्याची पत्नी चान लुएन चियांग (वय २९) हे मलेशियाचे रहिवासी आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चान गर्भवती राहिल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्याच वेळी परदेशात हनिमून करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे जोडपे दीर्घकाळापासून आर्थिक बचत करत होते. चान पाच महिन्यांची गरोदर असतानाच दोघांनी जपानला हनिमूनला जाण्याचा निर्णय घेतला. malaysia-viral-news या प्रवासासाठी त्यांनी आधीच विमान तिकीट आणि हॉटेलची बुकिंग केली होती. जपानमध्ये हनिमून सुरू असतानाच अचानक चानला तीव्र रक्तस्राव होऊ लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चानने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हा जन्म अपेक्षित वेळेच्या तब्बल २२ आठवडे आधी झाल्याने नवजात बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक बनली.
जन्माच्या वेळी बाळाचे वजन केवळ ४८० ग्रॅम होते. डिसेंबर महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर बाळाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून ती अजूनही आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. जपानमधील रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते बाळाची प्रकृती अजूनही गंभीर असून ती खूपच लहान आणि अशक्त आहे. malaysia-viral-news त्यामुळे मार्च २०२६ पूर्वी या जोडप्याला मायदेशी परतणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. या उपचारांचा वैद्यकीय खर्च सुमारे ३ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. आर्थिक अडचणीमुळे कुटुंबाने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले असून, अवघ्या तीन दिवसांत अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, गर्भधारणेदरम्यान प्रवासाबाबत डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यामुळेच ही गंभीर परिस्थिती उद्भवल्याचेही स्पष्ट होत आहे.