कर्ज वसुलीसाठी गेलेल्या उपसरव्यवस्थापकाला धक्काबुक्की

थकीत कर्जदाराविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
loan-recovery : राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अधिकाèयांना कर्जदाराने धक्काबुक्की करून सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड न करता उलट कर्जवसुली करणाèया संस्थांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढत असतानाच पतसंस्थेने मंगळवार, 6 जानेवारी रोजी थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई केल्याने थकीत कर्जधारकांचे धाबे दणाणले आहेत.
 

YTL 
 
 
राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उपसरव्यवस्थापक तथा वसुली अधिकारी संतोष पुनमचंद छापरवाल (वय 42) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नरेंद्र नामदेव लांजेवार (वय 58, शिवाजीनगर गार्डन चौक, टिळकवाडी, यवतमाळ) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 356(2), 352 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संतोष छापरवाल हे बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा 2002 अंतर्गत निबंधक, नवी दिल्ली यांच्या आदेशांनुसार विक्री अधिकारी म्हणून कार्यरत असून, भारतीय न्याय संहितेनुसार लोकसेवक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. आरोपी नरेंद्र लांजेवार यांनी 23 जानेवारी 2016 रोजी घर बांधणीसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र 2019 पासून त्यांनी कर्जफेड थकवली आहे.
 
 
थकीत कर्जाच्या वसुलीसाठी आणि जंगम, स्थावर मालमत्ता जप्तीची अंतिम नोटीस बजावण्यासाठी 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान पोलिस संरक्षणासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी आरोपीच्या घरी गेले असता, आरोपीने नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीस घराच्या दर्शनी भागावर चिकटवण्यात आली. मात्र आरोपीने ती नोटीस फाडून टाकली व वसुली अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस अमलदार यांच्याशी वाद घालून धक्काबुक्की केली. शिवीगाळ करत अंगावर धावून येत मारहाणीचा प्रयत्न केला. तसेच लोकसेवकांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने 6 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतसंस्थेच्या बदनामीचा प्रयत्न
 
 
राजलक्ष्मी पतसंस्थेचे काही थकीत कर्जधारक सोशल मिडियावर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून पतसंस्थेची बदनामी करणाèया खोट्या व आक्षेपार्ह पोस्ट टाकत सभासद व ठेवीदारांमध्ये गैरसमज पसरवत आहे. वास्तविक कर्ज न फेडल्यास पतसंस्था किंवा बँकांना कायदेशीर मार्गाने वसुली करण्याचा अधिकार आहे. अशा पृष्ठभूमीवर राजलक्ष्मी पतसंस्थेने कायद्याचा आधार घेत थेट पोलिस कारवाई केल्याने थकीत कर्ज धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई इतर पतसंस्थांसाठीही दिशादर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
ठेवीदारांचे पैसे सुरक्षित
 
 
ठेवीदारांनी विश्वासाने पतसंस्थेत ठेवीच्या स्वरुपात पैसे ठेवल्याने त्या पैशाचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. काही मोजके नागरिक कर्ज घेतात, मात्र पैशाची परतफेड करीत नाही. अशा थकीत कर्जधारकांविरुद्ध कठोर पावले उचलत आम्ही कारवाई करीत आहो. आमच्या पतसंस्थेमधील सर्व ठेवी सुरक्षीत राहण्याकरिता कठोर पावले उचलणे हे आमचे कर्तव्य आहे.
- क्षितिज तायडे
व्यवस्थापकीय संचालक
राजलक्ष्मी पतसंस्था, यवतमाळ