तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
vivekananda-gyan-rath : येथे होणाèया स्वामी विवेकानंद स्मारक उद्घाटन सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर ‘विवेकानंद ज्ञान रथ’चे भव्य आगमन झाले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा, साहित्याचा व राष्ट्रप्रेरणेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा ज्ञानरथ संपूर्ण यवतमाळ शहरात भ्रमण करीत आहे.
या विवेकानंद ज्ञानरथात रामकृष्ण मिशन प्रकाशित स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ, विवेकानंद साहित्य, रामकृष्ण परमहंस, माँ सारदादेवी यांचे जीवनचरित्र, युवक, विद्यार्थी व सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा ज्ञान रथ यवतमाळ शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व विविध सार्वजनिक ठिकाणी भेट देत असून, सर्वत्र त्याचे उत्स्फूर्त स्वागत व पूजन करण्यात येत आहे. युवकांमध्ये विवेकानंदांच्या विचारांबद्दल जागृती निर्माण होत आहे.
यवतमाळात आगमनप्रसंगी विवेकानंद ज्ञान रथाचे विधीवत पूजन करण्यात आले. या पूजनप्रसंगी प्रमोद बाविस्कर, देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव, तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, आजच्या युवकांनी विवेकानंदांचे साहित्य वाचून चारित्र्यवान व राष्ट्रनिष्ठ नागरिक घडावे, असे आवाहन केले. 12 जानेवारी रोजी स्मारक उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.