पथ्रोट,
onion : येथे पांढर्या कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात होते. बाहेरील व्यापारी वर्ग ते घेण्यास तयार असतात. औषधीयुक्त या कांद्याला खूप मागणी आहे. बहुतांश शेतकरी रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड करताना दिसतात. पौष महिन्यात त्याची सुरुवात होते. यापूर्वी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. पण, आता बदलत्या काळात मजुराच्या अभाव व खर्च वाढल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरच्या पेरणीला प्राधान्य देताना दिसत आहे.
कांदा हे नगदी पीक असून दराबाबत बेभरवशाचे आहे. असे असतानाही कांदा उत्पादनावर शेतकर्यांचा कायम भर राहिलेला आहे. कांदा लागवड ही पारंपारिक पद्धतीने करत असत शेत जमिनीच्या मशागतीनंतर रोप लागवड केली जाते. कांदा वाफ्यातील रोप दीड महिन्याने लागवडी योग्य होते. वाफ्यातून मजूर लावून रोप काढा लागायचे आणि पुन्हा त्याची लागवड करायची ही पद्धत किचकट व मजुरी खर्चिक असल्याने शेतकर्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होतो.
रोप लागवडीनंतर चार महिन्यांनी कांदा काढणे योग्य होता. मात्र, दरम्यानच्या रोपावरील किडीचा प्रादुर्भाव, धुवारीचा धोका कायम असतो. कांद्याचे रोप पिवळे पडतात. कांदा पेरणी वाफ्यात पाणी देता येईल अशा मशागत केलेल्या वाफ्यात केली जाते. हल्ली ट्रॅक्टरच्या साह्याने कांद्याची पेरणी करण्याकडे कल वाढलेला आहे. कारण वातावरणातील बदलामुळे वेळेत पेरणी आवश्यक आहे.
मजुरांचा अभाव हा कळीचा मुद्दा आहेच!
पेरलेला कांदा हा चार ते पाच महिन्यातच काढणी योग्य होतो. पेरून रोप तयार करणे, उपळणे, त्याची लागवड करणे हा सर्व खर्च टाळून थेट ट्रॅक्टरच्या पेरणी वरच भर दिला जात आहे. रोपाची देखभाल, मजुरीच्या महागाईचा आणि वेळेचाही अपव्यय होत असल्याचे दिसत असल्याकारणाने यंत्राद्वारे पेरणीवर भर वाढत दिसून येत आहे.
यंत्राद्वारे पेरणीचे फायदे
कांद्याची रोप तयार करून एकर क्षेत्राच्या पुनर लागवडीसाठी बाईला तीन-चार दिवस लागत होते. खर्च पण आठ ते दहा हजार पेक्षा जास्त होत होता. पेरणी यंत्राद्वारे कमी तासात होते. एकरी तीन किलोपर्यंत बियाणे पुरेशे आहे. पुनर लागवडीच्या कांद्यामध्ये अनेक रोग होतात. मर रोग हा विशेष करून होतो. थेट पेरणीमुळे रोपांची मुळे तुटत नाही. रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते, असे कांदा पेरणीस प्राधान्य देणार्या शेतकर्यांनी सांगितले आहे.