अर्जुनी मोरगाव,
Arjuni Moragaon accident आजचा दिवस तालुकावासियांसाठी अत्यंत दु:खद असून तीन गावातील तीन युवकांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे तालुका हादरुन गेला आहे.त या घटना ८ जानेवारी रोजी घडल्या आहेत.
८ जानेवारी हा दिवस तालुकावासिंयासाठी अत्यंत दुर्देवी ठरला. तालुक्यातील ताडगांव येथील संदिप वसंत नाकाडे या ४२ वर्षीय इसमाने अर्जुनी मोर. रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गोंदियाकडून चंद्रपुरकडे जाणार्या मालवाहू रेल्वेगाडीसमोर येवून आपले जीवन संपविले. संदिप नाकाडे असे त्याचे नाव असून तो कृषी केंद्र चालवित असल्याची माहिती आहे. दुसर्या घटनेत धाबेटेकडी/आदर्श येथील नंदेश्वर गजानन कापगते या ३५ वर्षीय विवाहीत युवकाचा शेतातील विद्युत रोहित्राच्या वीजधक्कयाने जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. तिसर्या एका घटनेत मोरगाव येथील दुर्गेश वामन चौधरी (२८) हा साकोली तालुक्यातील नातेवाईकाकडे दुचाकीने जात असताना त्याचा ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. या तिन्ही घटनांमुळे तालुका हादरुन गेला असून संपुर्ण तालुक्यासह तिन्ही गावात शोककळा पसरली आहे.