राजेश माहेश्वरी
आर्णी,
nalanda-bharane : नगरपरिषद निवडणुकीत मी जीवनात प्रथमतः निवडणुक लढलो आर्णीच्या नागरिकांनी मला भरभरुन मतरुपी मतदान करून मी नगर परिषद अध्यक्ष झालो. यामुळे मी आयुष्यभर आर्णीकरांचा ऋणी राहिल व आर्णीच्या विकासासाठी व नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी सदोदित प्रयत्न करेन, असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष नालंदा भरणे यांनी केले. ते आर्णी नप कार्यालयात गुरुवार, 8 जानेवारी रोजी आयोजित पदग्रहण सोहळ्यात बोलत होते. त्यांना मुख्यप्रशासक मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी पदभार दिला.
नालंदा भरणे पुढे म्हणाले, शहरातील पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, नाल्या, विद्युत पुरवठा, स्वच्छतेसह सर्व मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम करुन त्या पुर्ण करण्यासाठी सभागृहामधील सर्वांचे सहकार्य घेऊन ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. नागरिकांच्या स्वप्नातील आर्णी शहर कसे होणार यासाठी सर्वांचे सहकार्य घेऊन ते पुर्ण करण्याचे प्रयत्न करेन, असे सांगितले.
या पदग्रहण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष, माजी नप अध्यक्ष आरीज बेग, जितेंद्र मोघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व आर्णीचे माजी नप अध्यक्ष अनिल आडे, नप मधिल राष्ट्रवादी कांग्रेस अपच्या गटनेते निलोफर साजिद बेग, माजी उपाध्यक्ष राजू विरखेडे, शिवसेने शिंदेचे गटनेते पवन चाफळे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कांग्रेसचे नगरसेवक नीता खुशाल ठाकरे, अश्विनी संजय राऊत, मलनस शफी अ. रज्जाक, शाह यास्मिन रहेमान, भावना जयराज मुनेश्वर, सैयद रियाज वहाब, प्रिती योगेश शिवरामवार, अमोल सुधाकर मांगुळकर. राष्ट्रवादी काँग्रेसचे निलोफर साजिद बेग, अंजली खंदार, संजय व्यवहारे, अशपाक शेख, रुखसाना परविन, परशराम कुमरे. शिवसेना शिंदे गटाचे विशाल मनवर, पवन चाफले, छबू मनोज चारोडे. भाजपाच्या चैताली विशाल देशमुख, शिवसेना उबाठाच्या शितल प्रविण काळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अमोल मांगुळकर यांनी केले. तर आभार हरीश कूडे यांनी मानले.