मुंबई
PMPML fine Atharva Sudame सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेला कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे सध्या एका वादामुळे चर्चेत आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) पाठवलेल्या नोटिशीनंतर अथर्वविरोधात आता थेट ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्याच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काही जण PMPMLच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, तर अनेकजण या कारवाईला अन्यायकारक ठरवत विरोध करत आहेत.
काही दिवसांपूर्वी अथर्व सुदामेने PMPMLच्या एका बसमध्ये एक मनोरंजक रील शूट केली होती. ही रील अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. रीलमध्ये अथर्वने कंडक्टरची भूमिका साकारली होती. एका दृश्यात एक महिला प्रवासी एक फूल आणि एक ‘हाफ तिकीट’ मागते. मात्र, ज्या व्यक्तीसाठी हाफ तिकीट मागितले जाते तो तिचा पती असल्याचे समोर येते. यावर अथर्व मजेशीर संवाद करत “ते हाफ मॅड आहेत म्हणून हाफ तिकीट द्या” असे महिला म्हणते, तर त्यावर अथर्व गंमतीने “मग तुमचं ‘डिड तिकीट’ काढावं लागेल, कारण तुम्ही डिड शहाणी आहात” असे उत्तर देतो. हा विनोदी संवाद प्रेक्षकांना भावला आणि रील मोठ्या प्रमाणावर शेअर झाली.
मात्र, हीच रील अथर्वसाठी PMPML fine Atharva Sudame अडचणीचे कारण ठरली. PMPMLने परवानगीशिवाय बसमध्ये चित्रीकरण केल्याचा ठपका ठेवत त्याला नोटीस बजावली आणि आता ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असे PMPMLकडून स्पष्ट करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकरणावर अथर्वने आपली भूमिका मांडताना सांगितले की, ही रील केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती आणि कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. मात्र, PMPMLच्या कारवाईमुळे त्याला मोठा फटका बसल्याचे त्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर PMPML fine Atharva Sudame सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “बसमध्ये PMPMLचा कर्मचारी किंवा इतर लोक परवानगीशिवाय रील्स बनवतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई का होत नाही? फक्त अथर्व सुदामेवरच कठोर कारवाई का?” असा सवाल अनेकांनी केला आहे. काहींनी ही कारवाई नियमांच्या चौकटीत योग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी ती दुजाभावाची असल्याचा आरोप केला आहे.सध्या तरी अथर्व सुदामेवर ठोठावलेला ५० हजारांचा दंड हा अंतिम निर्णय असून, या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे सोशल मीडिया आणि त्याचे चाहते लक्ष ठेवून आहेत.