नागपूर,
Baljagat, Laxminagar दीनदयाल शोध संस्थान अंतर्गत बालजगत, लक्ष्मीनगर येथे बाल गुरुकुलच्या मुलांसाठी कॅम्प फायर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुलांसाठी विविध खेळ घेण्यात आले तसेच गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले.
मुलांसाठी तंबू उभारण्यात आले होते. तंबूमध्ये बसून मुलांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमातून बालजगतच्या मुलांनी भरभरून आनंद लुटला. Baljagat, Laxminagar या कार्यक्रमाला बालजगतच्या प्रकल्प प्रमुख अनुजा परचुरे, जयंत जोशी उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला.
सौजन्य :निकिता लुटे,संपर्क मित्र