भाऊसाहेब माने समाज भूषण पुरस्कार वितरण शनिवारी

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
bhausaheb-mane-samaj-bhushan-award : तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाèया व्यक्ती व सामाजिक संस्थेचा महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त भाऊसाहेब माने गौरव कृती समितीतर्फे शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
 
 
 
y8Jan-Mane
 
 
 
जिजाऊ सांस्कृतिक भवनात होणाèया या कार्यक्रमात आठ व्यक्ती व सामाजिक संस्थेचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्व. जेठमल माहेश्वरी व स्व. बंकटलाल भुतडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा क्षेत्रात योगदान देणारे सतीश मुडे, स्व. देवराव चोंढीकर व स्व. विठ्ठल देशमुख सवनेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद, स्व. नारायण शिलार व स्व. नारायणराव वानखेडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे संभाजी भोयर.
 
 
 
स्व. रामचंद्र सिंगनकर व अमानुल्ला जहागीरदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड, स्व. वामनराव उत्तरवार व स्व. गुलाबसिंग ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिव्यांग उद्योजक प्रशांत सराफ, स्व. सखाराम नरवाडे गुरुजी व स्व. सखाराम मुडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागेश मिरासे जिल्हा परिषद शाळा विडूळ.
 
 
स्व. भाई केशव देवसरकर व स्व. परसराम पिलवंड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिला सशक्तीकरण कार्य करणाèया रविता लकडे पोफाळी, स्व. नानासाहेब देशमुख व स्व. भास्कर गोविंदवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट रेशीम शेती करणारे सुशील मुधळे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
 
 
तालुक्यातील रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाऊसाहेब माने गौरव कृती समितीचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विजय माने, समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, सचिव बालाजी वानखेडे, कार्याध्यक्ष अविनाश चंद्रवंशी, देवानंद मोरे, शेतकरी कष्टकरी संघ अध्यक्ष शुभम माने आणि सर्व पदाधिकाèयांनी केले आहे.
 
तालुक्यातील समाजसुधारक, लोकनेत्यांचा आदर्श व त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याचा आदर्श समाजापुढे उभा रहावा व त्यांनी केलेल्या अखंडित समाज कार्याची प्रेरणा घेऊन वाटचाल करणाèयांचा सन्मान व्हावा, या हेतूने भाऊसाहेब माने प्रतिष्ठान प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजय माने यांच्या संकल्पनेतून स्व. भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.