अमरावतीच्या विकासासाठी भाजपाला मत द्या

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन -दसरा मैदानात झाली जंगी जाहीर सभा

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
अमरावती, 
chandrashekhar-bawankule : अमरावती शहराचा चौफेर विकास करण्याची योजना भाजपाने तयार केली आहे. केंद्र व राज्यात असलेल्या भाजपा सरकारच्या मदतीने ती पूर्णत्वास आणण्यासाठी महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणे आवश्यक असल्याने शहराच्या विकासासाठी भाजपाला मत देण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
 
 
jkl
 
 
 
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरूवारी दुपारी दसरा मैदान येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी त्यांना मुंबईत थांबावे लागल्याने त्यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी मंचावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, भाजपा नेत्या नवनीत राणा, शहराध्यक्ष नितीन धांडे, आमदार संजय कुटे, आ. प्रताप अडसड, जयंत डेहनकर, किरण पातुकर, रवींद्र खांडेकर, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, माजी महापौर चेतन गांवडे, तुषार भारतीय, सुनील खराटे, चरणदास इंगोले यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, भाजपा महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असून शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येईल. प्रत्येक प्रभागाचा विकास आराखडा तयार करण्यात येईल. कोराडी येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिरा प्रमाणे अमरावती येथील अंबा व एकविरा देवी मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
 
 
 
चिखलदरा देवी पॉईंट येथील विकासाठी तीन एकर जागा अंबादेवी संस्थानला देण्यात आली आहे. नागपुरच्या धरतीवर महिला बचत गटांना १ लाख अनुदान देणात येणार आहे. लाडकी बहीण योजना कोणत्याही स्थितीत बंद होणार नाही, असे सांगून सवलतीत वीज उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे. लवकरच हे प्रयत्न फळाला येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी शहरात सुलभ स्वच्छतागृह उभारले जातील. रेल्वे उड्डानपुलाचे काम लवकरच सुरू होणार असून त्याचा आराखडा तयार झाला आहे. १५ जानेवारीला तुम्ही आम्हाला सांभाळा पुढचे ५ वर्ष आम्ही तुम्हाला सांभाळू. केंद्र व राज्य शासनाच्या योजना व निधी प्राप्त करून घेण्यासाठी विकासाचे तिसरे इंजीन म्हणून अमरावतीत भाजपाचा महापौर होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी संपूर्ण ताकदतीने प्रयत्न करण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
 
 
खा. बोंडे म्हणाले, महापालिका निवडणुकीत शिवसेना असो किंवा युवा स्वाभिमान, काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये आपला भाऊ जरी उभा असला तरी आपण केवळ भाजपाच्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कटिबद्ध असावे असे आवाहन त्यांनी केले. नवनीत राणा म्हणाल्या, मी भाजपाशी प्रामाणिक आहे. मला कोणी सल्ला देण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महायुतीत असून ज्यांना आपले चिन्ह किंवा फोटो देखील नको होता, अशांना विधानसभा निवडणुकीत भाजपाने साथ दिली. ते विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत गद्दारी करणार्‍यांना मी मुळीच सोडणार नाही. भाजपात असणार्‍या अनेकांनी देखील लोकसभेमध्ये कमळाचा विरोध केला. त्या सार्‍यांना धडा शिकविण्याचा इशाराच नवनीत राणा यांनी दिला. काही झाल तरी अमरावती महापालिकेचा महापौर हा भाजपाचा बनेल असे त्यांनी स्पष्ट केले. अन्य नेत्यांची पण भाषणे झाली. सभेच्या शेवटी सर्वांनी विजयाचा संकल्प केला. सभेला मोठ्या संख्येने बंधू व भगिनींची उपस्थिती होती.