आकाशातच थांबला जीव; जयपूर-बंगळुरू फ्लाइटमध्ये चिमुकल्याचा मृत्यू

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
इंदूर,  
child-died-on-jaipur-bengaluru-flight जयपूरहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात उड्डाणादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. प्रवासाच्या मधोमध अवघ्या एक वर्षाच्या बाळाला अचानक श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागल्याने विमानाला तातडीने प्राधान्याने उतरवण्याचा निर्णय घ्यावा लागला. फ्लाइट क्रमांक IX1240 ला रात्री बंगळुरूला पोहोचायचे होते, मात्र परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता पायलटने सायंकाळी सुमारे आठच्या सुमारास एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे इंदूरमध्ये वैद्यकीय आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.
 
child-died-on-jaipur-bengaluru-flight
 
विमानातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेले एक डॉक्टर तात्काळ मदतीला धावले. त्यांनी हवेतच त्या बाळाला सीपीआर देत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. विमान इंदूर विमानतळावर उतरल्यावर एअरलाइनकडून आधीच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. child-died-on-jaipur-bengaluru-flight बाळाला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी माहिती देताना सांगितले की, ६ जानेवारी रोजी जयपूर–बंगळुरू फ्लाइटमध्ये एका बाळाला वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाली होती. child-died-on-jaipur-bengaluru-flight त्यामुळे क्रूने विमान इंदूरकडे वळवण्याचा निर्णय घेतला. क्रू सदस्यांसह विमानातील डॉक्टरांनी तात्काळ मदत केली आणि लँडिंगनंतर बाळालाला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीच्या गंभीर अवस्थेमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कठीण प्रसंगी एअरलाइनकडून संबंधित कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.