अनिल कांबळे
नागपूर,
deadly-nylon-kite-string-incident : नायलाॅन मांजा गळ्याला अडकून काहींचे बळी गेले असून अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे नायलाॅन मांजा वापरणाऱ्यावर आणि विक्री करणाऱ्यांवर लावलेला दंड हा एखाद्याच्या जीवापेक्षा माेठी नाही. लाेकांजी जीव महत्वाचा आहे, असे नायलाॅन मांजावर लावलेल्या दंडावर दाखल एका मध्यस्थी अर्जावर माैखिकपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.
नायलाॅन मांजाने पतंग उडविताना आढळ्यास 50 हजार रुपये दंड आणि नायलाॅॅन मांजा विक्री करणाèया दुकानदारावर अडीच लाख रूपयांचा दंड ठाेठावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी यासंदर्भात कुणाचे काही आक्षेप असल्यास त्यांनी मत मांडावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी आता साेमवारी (ता. 12 जानेवारी) राेजी सुनावणी हाेणार आहे.
विदभार्तील सर्व जिल्हाधिकाèयांना मराठी, हिंदी व इंग्रजी या सर्व अग्रगण्य वर्तमानपत्रात पहिल्या पानावर नायलाॅन मांजा वापरु नये तसेच आक्षेप नाेंदविण्यासंदर्भात ‘पब्लिक नाेटीस’ प्रकाशित करण्याचे आदेश मागील सुनावणीत उच्च न्यायालयाने दिले हाेते. परंतु या आदेशाचे पालन विदर्भातील जिल्हाधिकाèयांनी केले नसल्याचे दिसून आले आहे. जिल्हाधिकाèयांनी केवळ निवडक हिंदी व मराठी वर्तमानपत्रात ‘पब्लिक नाेटीस’ पहिल्या पानावर प्रकाशित करण्यास दिली हाेती. याच प्रकरणात उच्च न्यायालयाने संबंधित जिल्हाधिकाèयांना 5 जानेवारी राेजी झालेल्या सुनावणीदरम्यान चांगलेच फटकारले हाेते. तसेच न्यायालयाने त्यांना आदेशाचे पालन करण्यासही सांगितले हाेते.
दरम्यान नायलाॅन मांजाने पतंग उडविताना आढळला तर 50 हजार रुपये दंड आणि नायलाॅॅन मांजा विक्री करणाèया दुकानदारावर अडीच लाख रूपयांचा दंड ठाेठावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. या दंडाच्या रकमेबाबत काही आक्षेप नाेंदवायचे असेल तर त्यांनी 8 जानेवारीच्या सुनावणीपूर्वी नाेंदवावे. त्यासाठी जनतेला सूचना मिळण्यासाठी व आक्षेप नाेंदविण्यासाठी उच्च न्यायालयाने सर्व जिल्हाधिकाèयांना अग्रगण्य वर्तमानपत्रात मंगळवारी (7 जानेवारी) राेजी पब्लिक नाेटीस देण्याचे आदेश दिले हाेते. या आदेशानुसार विदर्भातील सर्व अग्रगण्य वर्तमानपत्रात पब्लिक नाेटीस देण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे, असे वकिलांनी सांगितले. सरकारर्ते अॅड. शिशीर उके, प्रदूषण नियंत्रण मंडळार्ते अॅड. रवी सन्याल यांनी बाजू मांडली.
पालकांसाठी दंडाची रक्कम जास्त ?
नायलाॅन मांजाचा वापर व विक्रीवर दंड जास्त असल्याचा मध्यस्थी अर्ज माेहमंद अल्ताफ खान यांनी दाखल केला. त्यांनी गुरुवारी न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती राज वाकाेडे यांच्यासमक्ष झालेल्या सुनावणीदरम्यान स्वतः बाजू मांडली. खान यांनी बाजू मांडताना सांगितले की, नायलाॅन मांजा वापरण्यावर व विक्रीवर लावलेला दंड जास्त आहे. ते पालक व लहान विक्रेते भरू शकत नाही. पालक मुलांवर चाेवीस तास लक्ष ठेवू शकत नाही. तसेच लहान मुलांनी पालकांच्या अपराेक्ष नायलाॅन मांजाने पतंग उडविल्यास पालकाला नाहक भुर्दंड बसेल. लहान विक्रेत्यांना जर अडीच लाख रुपये दंड ठाेठावला तर त्याचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे माेडेल. त्यामुळे न्यायालयाने दंडाची रक्कम कमी करावी, याबाबत विचार करावा, असेही खान म्हणाले.
दंड फक्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाच: न्यायालय
नायलाॅन मांजामुळे जर एखाद्याचा जीव गेला तर ती जीवित हाणी न भरुन निघणारी आहे. दंड हा कुणाचे आर्थिक नुकसान व्हावे यासाठी नसून मांजा विक्रेत्यांवर वचक बसावा म्हणून आहे. दंडाबाबत प्रत्येक जण हा समान आहे. लहान किंवा व माेठा विक्रेता असा भेद करता येणार नाही. जे नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्याकरिता दंड आहे. नायलाॅन मांजा वापरलाच नाही किंवा विक्री केलाच नाही तर दंड भरण्याचा प्रश्नही उद्भवत नाही, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले.