झणझणीत टोला देवा भाऊ म्हणतात.. ‘उनको मिरची लगीं, तो मैं क्या करूँ'

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
धुळे,
devendra fadnavis महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सर्व पक्षांचे प्रमुख नेते सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव आणि धुळे दौऱ्यावर होते. त्यांनी दोन्ही शहरांमध्ये महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार कार्यक्रम राबवले.
 

devendra fadnavis  
जळगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भव्य रोड-शो झाले. तर धुळ्यात त्यांनी भाजप उमेदवारांसाठी मोठी सभा आयोजित केली. या सभेत फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “धुळे महापालिकेसह राज्यभरात भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामुळे विरोधकांना मिरची झोंबली आहे. ‘उनको मिरची लगीं, तो मैं क्या करूँ?’” अशा झणझणीत भाषेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
 
 
फडणवीस यांनी devendra fadnavis काँग्रेसच्या काळातील उदाहरण दिले. ते म्हणाले, “काँग्रेसच्या काळात ३३ खासदार बिनविरोध निवडून आले, तेव्हा लोकशाही जिवंत होती. आता भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर लोकशाही धोक्यात आली का?” या वक्तव्याद्वारे त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर स्पष्टपणे आपली बाजू मांडली.राज्यातील महापालिका आणि नगरपालिकेतील निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराला वेग दिला असून, फडणवीस यांचे सभेतले भाषण कार्यकर्त्यांना उत्साही बनवणारे ठरले. पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नगरसेवक उमेदवारांसाठी रस्त्यावरील प्रचार करत असून, नगरपालिकेतील निवडणुकीत विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने आखणी करण्यात आली आहे.एकूणच, धुळे दौऱ्यात फडणवीस यांच्या उपस्थितीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उमेदवारीसाठी ताकद वाढली असून, विरोधकांवरही प्रभावी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.