गोविंदराव वंजारी कॉलेज येथे ‘ओरिएंटा २०२५-२६’ यशस्वी

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (जीडब्ल्यूसीईटी) येथील पॉलिटेक्निक विद्यार्थी मंचाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॅम्पसमध्ये सह-अभ्यासक्रम व अतिरिक्त-अभ्यासक्रम उपक्रमांची यशस्वी मालिका आयोजित केली. ‘ओरिएंटा २०२५-२६’ या बॅनरखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
 
varl
 
 
या अंतर्गत पोस्टर, पेपर व प्रश्नमंजुषा स्पर्धांसह तांत्रिक स्पर्धा तसेच बॉक्स क्रिकेट लीग, दोरीखेच, ट्रेझर हंट आणि ई-स्पोर्ट्स यांसारख्या क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमांचा समारोप समारंभाने झाला.Govindrao Vanjari College यावेळी विजेत्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी आयोजन समितीच्या प्रयत्नांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व अतिरिक्त-अभ्यासक्रम उपक्रमांत उत्कृष्टतेसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पॉलिटेक्निक समन्वयक प्रा. राज कुहिते व फोरम प्रभारी प्रा. चेतन समर्थ यांनी समिती व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सौजन्य:मनोज वैराळकर,संपर्क मित्र